
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (९ मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकून विजेतेपद मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, दोन्ही संघ यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने-सामने आहेत. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती घेऊ शकतो अशी शक्यचा वर्तवण्यात आली आहे. याबाबत आता त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.