

Shivang Kumar
Sakal
Shivang Kumar & Sushant Mishra 5 Wickets Haul: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा अनेक फलंदाज गाजवत असले, तरी गोलंदाजीत दमदार कामगिरी करत दोन गोलंदाजांनी सर्वाचे लक्ष वेधले आहे. हे दोन गोलंदाज म्हणजे झारखंडचा सुशांत मिश्रा आणि मध्यप्रदेशचा शिवांग कुमार.
या दोघांनी अखेरच्या साखळी फेरीतही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आयपीएलला दोन महिने बाकी असताना या दोघांच्या कामगिरीने त्यांच्या आयपीएल संघांना आनंद झाला असेल. आयपीएल २०२६ साठी सुशांत मिश्राला राजस्थानने ९० लाखांना, तर शिवांग कुमारला काव्या मारनची संघ मालकी असलेल्या सनरायझर्स हैदराबादने ३० लाखाला खरेदी केले आहे.