

Ruturaj Gaikwad scored his 15th century in Vijay Hazare Trophy
Sakal
Ruturaj Gaikwad World Record: महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नव्या वर्षातही त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. तो लिस्ट ए क्रिकेटमधील भारताचा सध्याच्या एक उत्तम फलंदाज का आहे, हे त्याने आता गुरुवारी (८ जानेवारी) पुन्हा दाखवून दिले आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) दुसरे शतक झळकावले आहे.
या स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राचा अखेरचा साखळी सामना गोव्याविरुद्ध जयपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात एकिकडे महाराष्ट्राचे सर्व प्रमुख फलंदाज अपयशी ठरलेले असताना ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) मात्र संघाला संकटातून बाहेर काढले आणि महाराष्ट्राला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यामुळे गोव्यासमोर आता विजयासाठी धावांचे लक्ष्य आहे.