IPL 2026 Updates: सनरायझर्स हैदराबादला धक्का... बदली खेळाडूच बदली झाला... दोन सामने खेळून घरी परतला, नशीबाची थट्टा

David Payne ruled out IPL 2026 after ankle injury: आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. जॅक एडवर्ड्सच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल झालेला डेव्हिड पेन आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पेनला टाचेला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
Kavya maran

Kavya maran

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad squad changes IPL 2026: सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पाचपैकी २ सामने जिंकता आले आहेत. मागील सामन्यात त्यांनी बलाढ्य राजस्थान रॉयल्सला पराभूत करून आत्मविश्वास कमावला आहे. त्यात कर्णधार पॅट कमिन्सनेही फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि तो लवकरच आयपीएल खेळण्यासाठी भारतात दाखल होईल. असे असताना SRH ला गुरुवारी मोठा धक्का बसला आहे. आयपीएल हंगामा सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी रिप्लेसमेंट खेळाडू आलेला खेळाडूच आता जखमी झाला आणि त्याने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे. SRH ने त्यांच्या सोशल मीडियावर हे अपडेट्स दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com