SRH vs RR : "हा पुरस्कार माझ्या कुटुंबियांना समर्पित"! Praful Hinge ने पहिल्याच सामन्यात इतिहास रचला; म्हणाला, त्यांचा त्याग...

Praful Hinge player of the match speech IPL 2026 SRH vs RR: प्रफुल हिंगेन इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये स्वप्नवत पदार्पण करत इतिहास रचला आणि त्यानंतर आपल्या कृतीने सर्वांची मने जिंकली. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी विजय मिळवताना हिंगे हा खरा हिरो ठरला.
Praful Hinge dedicated his POTM award for his family for all the sacrifices

Praful Hinge dedicated his POTM award for his family for all the sacrifices

esakal

Updated on

Praful Hinge dedicates award to family emotional moment IPL: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज सर्व आघाड्यांवर दमदार कामगिरी करताना अपराजित असलेल्या राजस्थान रॉयल्सला पराभवाची चव चाखवली. SRH च्या २१६ धावांचा पाठलाग करताना RR चा निम्मा संघ ९ धावांतच तंबूत परतला होता. पदार्पण करणाऱ्या विदर्भच्या प्रफुल हिंगेने ( Praful Hinge) पहिल्याच षटकात तीन फॉर्मात असलेले फलंदाज माघारी पाठवून निकाल स्पष्ट केला. त्यानंतर दुसरा पदार्पणवीर साकीब हुसैनने ४ धक्के देताना राजस्थानला १५९ धावांत गुंडाळले. हैदराबादने ५७ धावांनी हा सामना जिंकला. ४ विकेट्स घेणाऱ्या प्रफुल हिंगेला सामनावीर पुरस्कारने गौरविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com