Asia Cup Rising Stars: तिलक वर्माच्या भारतीय संघाचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपलं! श्रीलंकेकडून दारुण पराभव

India A Knocked Out of Asia Cup Rising Stars 2026: रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाचे आव्हान संपले आहे. भारताचा उपांत्य फेरीत श्रीलंका अ संघाने पराभव केला. त्यामुळे श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026

India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026

Sakal

Updated on: 

India A vs Sri Lanka A, Asia Cup Rising Stars 2026: रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाचे आव्हान गुरुवारी संपले. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका अ संघाविरुद्ध दोहामध्ये झाला. या सामन्यात श्रीलंका अ संघाने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवक अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता रविवारी ते अंतिम सामना खेळतील.

गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर ३१८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र श्रीलंकेने दोन्ही सलामीवीरांनी केलेल्या शतकांच्या जोरावर ३१८ धावांचे लक्ष्य ४१.३ षटकात २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026
IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य
Loading content, please wait...