Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Sri Lanka Chase 430 Against England: वन डे क्रिकेटमध्ये श्रीलंकेने ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंडविरुद्ध ४३० धावांचे अवाढव्य लक्ष्य पार केले. रावळपिंडी येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने २०२ धावांची वादळी खेळी केली होती. त्याच्या द्विशतकी खेळीमुळे इंग्लंडने श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे केले. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी हार न मानता लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
Sri Lanka Chase 430 Against England

Sri Lanka Chase 430 Against England

Updated on: 

Second-highest successful run chase in ODI history: वन डे क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय सामना रावळपिंडीत पाहायला मिळाला.. पाकिस्तानात सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील इंग्लंड विरुद्ध श्रीलंका लढतीत अक्षरशः धावांचा पाऊस पडला. हॅरी ब्रूकच्या ( Harry Brook) द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ४ बाद ४२९ धावांचा डोंगर उभा केला आणि श्रीलंका हा सामना गमावतील असाच सर्वांच अंदाज होता. पण, श्रीलंकेने शेवटच्या षटकापर्यंत खिंड लढवली आणि २ विकेट्स व १ चेंडू राखून मॅच जिंकली. वन डे क्रिकेट इतिहासातील हा दुसरा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com