.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Sri Lanka Tour of England Test Series: श्रीलंका क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. श्रीलंकेला या दौऱ्यात यजमान इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेला २१ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी श्रीलंकेने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने या मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेलची नियुक्ती केली आहे.
इयान बेल १६ ऑगस्टपासून श्रीलंका संघाबरोबर काम करण्यास सुरुवात करेल. तो मालिका संपेपर्यंत संघाबरोबर राहणार आहे.