Virat Kohli and Angelo MathewsSakal
Cricket
Cricketer Retirement: 100 हून अधिक कसोटी खेळणाऱ्या आणखी एका दिग्गजाची निवृत्ती; जूनमध्ये खेळणार शेवटचा सामना
Angelo Mathews to Retire from Test: विराट कोहली आणि रोहित शर्मा नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. आता त्यांच्यापाठोपाठ आणखी एका दिग्गजाने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. आता आणखी एका दिग्गजाने कसोटी क्रिकेटला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.
तो १७ जूनपासून गॉल येथे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे.