Sri Lanka’s spinners dismantle New Zealand’s batting lineup
esakal
T20 WC, SL vs NZ Marathi Cricket News : श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जेरीस आणले. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सहयजमान श्रीलंकेला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या गोलंदाजांनी त्या विजयाचा पाया रचलेला आहे. महीश थीक्षणा, दुनिथ वेल्लालागे या फिरकीपटूंसह दुष्मंथा चमीराने न्यूझीलंडच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. १० ते १२ षटकांतील २० चेंडूंत किवींनी ४ फलंदाज गमावले आणि तिथून सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकला होता. पण, मिचेल सँटनर व कोल मॅकोंची ही जोडी उभी राहिली आणि संघाला ६ बाद ८६ वरून दीडशेपार घेऊन गेली.