
श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला वनडे तिरंगी मालिकेत भारतीय संघाला रविवारी (४ मे) यजमान श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. भारतीय महिला संघाने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात मात्र श्रीलंका महिला संघाने त्यांना ३ विकेट्सने पराभूत केले.
याआधी या मालिकेत भारताने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. आता श्रीलंकेनेही पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिला आणि नंतर आता भारताला पराभूत केल्यानंतर ४ गुण मिळवले आहेत. भारताचेही ४ गुण आहेत.