Sri Lanka wins 2nd Test by innings against Bangladesh
पहिल्या कसोटीत धावांचा एव्हरेस्ट उभ्या करून मोठ्या थाटात मिरवणाऱ्या बांगलादेशची कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने जिरवली. श्रीलंकेच्या ४५८ धावांचा टप्पा त्यांना दोन्ही डावात मिळूनही ओलांडता आला नाही. श्रीलंकेने एक डाव व ७८ धावांनी विजय मिळवून बांगलादेशविरुद्धची ही मालिका १-० अशी जिंकली. फिरकीपटू प्रभात जयसूर्याने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. कसोटीच्या पाचव्या दिवशी तासाभरात बांगलादेशचे चार फलंदाज माघारी परतले.