England Cricket, Test Coach: ब्रेंडन मॅक्युलम OUT? इंग्लंडला मिळणार नवा कोच; CSKशी नातं तोडलेल्या दिग्गजाची एन्ट्री!

Stephen Fleming England Test coach latest news: ब्रेंडन मॅककुलमनंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्टीफन फ्लेमिंग यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. डिसेंबर 2026 पासून ते इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारू शकतात.
Stephen Fleming England Test coach

England Cricket, Test Coach

esakal

Updated on

Stephen Fleming England Test coach latest news: इंग्लंड क्रिकेटच्या कसोटी संघाला लवकरच नवा मुख्य प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. ब्रेंडन मॅककुलम यांनी पद सोडल्यानंतर आता या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्ड फ्लेमिंग यांच्या नावाचा गंभीरपणे विचार करत आहे.

अनेक वर्षे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे(CSK) मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केल्यामुळे त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. नुकताच त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता ते इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com