
Sri Lanka vs Australia 2nd Test: श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (६ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. गॉल येथे होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दमदार फलंदाजी करत या मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकले आहे. यासोबतच त्याने काही मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
या सामन्यात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात २५७ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीला उतरला. ऑस्ट्रेलियाने ३७ धावात दोन विकेट्स गमावल्यानंतर स्मिथ फलंदाजीला उतरला. त्याने आधी उस्मान ख्वाजासह अर्धशतकी भागीदारी केली.