STEVE SMITH RETIRE: भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला! ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने घेतली निवृत्ती, म्हणाला...

India vs Australia Champions trophy 2025 : १७० वन डे सामन्यांनंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या वन डे कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास काल भारताविरुद्धच्या पराभवानंतर संपुष्टात आला.
STEVE SMITH RETIREMENT
STEVE SMITH RETIREEsakal
Updated on

Steve Smith Announced Retiement: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वन डे कारकिर्दीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्मिथ कसोटी आणि ट्वेंटी-२० संघात निवडीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com