

Steve Smith breaks Rahul Dravid record
Sakal
Steve Smith scores century in Ashes Test match: ऍशेस २०२५-२६ मालिकेतील अखेरचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी (४ जानेवारी) सुरू झाला आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडून पहिल्या डावात दमदार फलंदाजी झाली आहे.
इंग्लंडकडून जो रुटने शतक केल्यानंतर तिसऱ्या दिवशी (मंगळवार, ६ जानेवारी) ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडपाठोपाठ (Travis Head) कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही (Steve Smith) शतक केले आहे. स्मिथचे हे शतक विक्रमी ठरले आहे.