

Ben Stokes and Marnus Labuschagne Heated Exchange:
Sakal
Ben Stokes Marnus Labuschagne clash: ऍशेस मालिकेत नेहमीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात रोमांचक स्पर्धा पाहायला मिळते. या मालिकेदरम्यान मोठ्या प्रमाणात स्लेजिंगही होते, तसेच खेळाडूंमध्ये वादाचे प्रसंगही अनेकदा ओढावले आहेत.
सध्याही सुरू असलेल्या ऍशेस २०२५-२६ मालिकेतही (Ashes 2025-26) सोमवारी अशी घटना घडली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस (Marnus Labuschagne) लॅब्युशेन यांच्यात शाब्दिक वाद झाले.
या मालिकेत इंग्लंडकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. मात्र पहिले तीन सामने गमावल्यानंतर चौथा सामना जिंकून त्यांनी प्रतिष्ठा राखली आहे. अशा आता पाचवा सामना रविवारी (४ जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला आहे.