
Sydney Sixers vs Perth Scorchers BBL: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेत स्टीव्ह स्मिथने सलग दोन शतके केली होती. आता ही मालिका ऑस्ट्रेलियाने ३-१ ने जिंकल्यानंतर बरेच खेळाडू बिग बॅश लीग खेळण्यासाठी परतले आहेत.
यात स्टीव्ह स्मिथचाही समावेश आहे. स्मिथने कसोटी मालिकेनंतर पर्थ स्कॉचर्सविरुद्ध बीबीएल २०२४-२५ मध्ये पहिलाच सामना खेळताना वादळी शतक ठोकले आहे.