Women's World Cup : भारतीय महिला संघाचे गाणं ऐकलंत का? चार वर्षांपूर्वी ठरवलं होतं, जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा... Video Viral

Indian Women team unveil their team song : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष एक खास पद्धतीने साजरा केला. चार वर्षांपूर्वी या संघाने ठरवलं होतं, “जेव्हा आम्ही वर्ल्ड कप जिंकू, तेव्हा हे गाणं गाऊ…” आणि अखेर तो क्षण आला.
Team India Women sing their long-promised World Cup victory song

Team India Women sing their long-promised World Cup victory song

ESAKAL

Updated on

Emotional video of India women cricketers singing after World Cup win: भारतीय महिला क्रिकेट संघाने वन डे वर्ल्ड कप विजयाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीनं केलं. दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये ५२ धावांनी विजय मिळवून भारतीय महिलांनी पहिले वर्ल्ड कप जेतेपद नावावर केले. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर भारताला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधाराचा मान हरमनप्रीत कौरने पटकावला आहे. भारताला आयसीसी स्पर्धा जिंकून देणारी ती चौथी कर्णधार ( पुरुष व महिला) ठरली आहे. या विजयानंतर भारतीय संघ खेळपट्टीभवती उभा राहिला आणि जेमिमा रॉड्रिग्जने गाण्याची सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी संघाने ठवलेले की जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा संघाचे हे गाणे गाऊ.. आज तो क्षण आलाय, असे जेमिमा म्हणाली..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com