

Sunil Chhetri - Gurpreet Singh
Sakal
भारतीय फुटबॉलमधील वाद संपताना दिसत नाहीयेत. अद्यापही इंडियन सुपर लीगचा (ISL) नवा हंगाम सुरू झालेला नाही. तसेच एकूणच भारतीय फुटबॉल (Indian Football) मोसम सध्या खंडित असल्यामुळे संभ्रमावस्था आहे. त्यामुळे सध्या भारतीय फुटबॉल खेळाडूंसह प्रशिक्षक आणि चाहतेही संभ्रमात आहेत. खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये राग, निराशा अन् हतबलता वाढत आहे.
त्यामुळे अखेर शुक्रवारी फुटबॉलपटूंनी या सर्व गोष्टींवर स्पष्टता मिळण्यासाठी भावनिक व्हिडिओ शेअर करत आर्त हाक दिली आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील छेत्री, गुरप्रीत सिंग संधू, संदेश झिंगन, राहुल भेके दिसत आहेत. या खेळाडूंनी FIFA कडे भारतीय फुटबॉलला वाचवण्यासाठी पावले उचलण्याचीही विनंती केली आहे.