Indian Super League 2025 delay
esakal
भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीगला (आयएसएल) यंदाच्या मोसमात अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे फुटबॉलपटू, प्रशिक्षक, चाहत्यांचे नुकसान होत आहे. राग, निराशा अन् हतबलता वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आयएसएल ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची आर्त हाक भारतातील फुटबॉलपटूंकडून मारण्यात आली आहे.