

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane Retirement
Sakal
Sunil Gavaskar Pays Tribute to Ajinkya Rahane's Captaincy: भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणेने (Ajinkya Rahane) मागच्या आठवड्यात सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या निवृत्तीबद्दल (Retirement) माहिती दिली. रहाणे भारताचा अनेक वर्षे मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज राहिला होता.
तसेच त्याने अनेकदा नियमित कर्णधारांच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. त्याच्या नेतृत्वातील उल्लेखनीय मालिका विजय म्हणजे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१. पण असे असले तरी त्याला अपेक्षित श्रेय (Credit) मिळाले नसल्याचे सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) म्हटले आहे.