
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रविवारी सामना होत आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हा सामना होत असल्याने सामन्याची उत्सुकताही दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. दरम्यान, या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून इमाम उल हक आणि बाबर आझम सलामीला फलंदाजीला उतरले.