Sunrisers Hyderabad (SRH) have picked Dilshan Madushanka as a replacement for Brydon Carse
esakal
Sri Lankan pacer Dilshan Madushanka as replacement for Brydon Carse : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत करून स्पर्धेत खरी रंगत निर्माण केली आहे. फलंदाजांची तगडी फौज असलेला हा संघ मागील पर्वात अपयशी ठरला होता, तत्पूर्वी त्यांनी २०२४ मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी त्यांची सुरुवात काही खास झाली नसली तरी त्यांनी काल यंदाच्या पर्वातील सर्वात डेंजर संघ RR ला पराभूत केले आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. प्रफुल हिंगे व साकिब हुसैन या दोन युवा गोलंदाजानी कालचा सामना गाजवला. त्यात आता पॅट कमिन्सही दाखल होतोय आणि SRH ने आणखी एक डाव टाकला आहे.