

Suryakumar Yadav
Sakal
Suryakumar Yadav on India loss 4th T20I vs New Zealand: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात ५० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवू आधीच विजय निश्चित केला आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यातील निकालाचा परिणाम मालिकेच्या निकालावर होणार नाही.
पण या मालिकेतील प्रत्येक सामना आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या (T20 World Cup 2026) तयारीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ त्यादृष्टीनेही या मालिकेत खेळत आहेत. टी२० वर्ल्ड कप ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.