

Suryakumar Yadav
esakal
Suryakumar Yadav First Season Salary: भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) सध्या चर्चेत आहे. मात्र, त्याच चर्चेत येण्याचं कारण क्रिकेट नसून, समालोचक आणि माजी खेळाडू आकाश चोप्रासोबत झालेल्या एका मुलाखतीदरम्यान केलेला खुलासा आहे. या मुलाखतीत आकाश चोप्राने सूर्यकुमारला अनेक प्रश्न विचारले. याच मुलाखतीत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पहिल्या हंगामासाठी नेमके किती पैसे मिळाले होते, याबद्दलही सांगितलं.
नुकताच २०२६ मध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमारला भारतीय टी-२० संघातून वगळण्यात आलं आहे. याबद्दल तो आतापर्यंत फारसं बोलला नव्हता. मात्र, आता त्याने या निर्णयावरही आपलं मत मांडलं आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना त्याला पहिल्या हंगामात मिळालेल्या पैशांचाही खुलासा केला.