

Suryakumar Yadav and Hardik Pandya Fume at Kuldeep Yadav | India vs Pakistan
Sakal
रविवारी (१५ फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना पार पडला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले आणि सुपर ८ फेरीत थाटात प्रवेश केला. पाकिस्तानचा हा टी२० वर्ल्ड कपमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.
तसेच भारताने टी२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2026) इतिहासात पाकिस्तानला पराभूत करण्याची ही आठवी वेळ होती. याशिवाय मर्यादीत षटकांच्या आयसीसीच्या (ICC) स्पर्धेतील भारताचा हा सलग १६ वा विजय होता. पण असे असले तरी सामना संपल्यानंतर मैदानात भारतीय खेळाडूंमध्येच वातावरण तापल्याचे दिसून आले.