

Suryakumar Yadav on Retirement | India vs New Zealand | T20 World Cup 2026
Sakal
Suryakumar Yadav on Retirement : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जिंकले. रविवारी (८ मार्च) अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केलं आणि टी२० विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं. मायदेशात टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला.