Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Suryakumar Yadav emotional statement after playoff exit: मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२६ मधील निराशाजनक मोहिमेचा शेवट झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने भावनिक प्रतिक्रिया दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा प्ले ऑफमधील प्रवास संपला. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमारने संघ १० ते १५ धावा कमी पडल्याचे स्पष्ट मान्य केले.
Suryakumar Yadav reaction after Mumbai Indians defeat

Suryakumar Yadav reaction after Mumbai Indians defeat

ESAKAL

Updated on

Suryakumar Yadav reaction after Mumbai Indians defeat vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवून मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर फेकले. MI च्या १६६ धावांचा पाठलाग करताना RCB कडून कृणाल पांड्याने ( Krunal Pandya) अविश्वसनीय खेळी केली. पण, १८व्या षटकात तिलक वर्माच्या अफालतून झेलने सामन्याला कलाटणी दिली.

झेलबाद होण्यापूर्वी कृणालने त्या षटकात दोन षटकार खेचून RCB साठी संधी ठेवली होती. मात्र, जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात फक्त ३ धावा दिल्या अन् सामना पुन्हा मुंबईच्या पारड्यात झुकला. राज बावाने हा सामना जिंकण्यासाठी चांगले प्रयत्न केले, पंरतु शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेण्यात RCB यशस्वी ठरले आणि ते IPL 2026 Point Table मध्ये ते अव्वल स्थानी पोहोचले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com