Suryakumar Yadav is available for Mumbai Indians’ crucial clash against RCB
esakal
Suryakumar Available for RCB Game, Hardik Pandya’s Availability Uncertain: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून मुंबईचा संघ जवळपास बाहेर गेला असला तरी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी ते विजयाने लीगचा निरोप घेण्याचा प्रयत्नात आहेत. पण, कर्णधार हार्दिक पांड्या याच्या खेळण्यावर अनिश्चितता आहेच आणि सूर्यकुमार यादवही रविवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, हा प्रश्न आहेत. त्यात सूर्यकुमारची भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून गच्छंती होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.