
भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी स्वीकारली. यानंतर आता भारताच्या संघासमोर मोठे लक्ष्य असेल ते आशिया कप २०२५ स्पर्धेचे. टी२० स्वरुपात यंदा ही स्पर्धा खेळली जाणार असून २९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू होणार आहे.
दरम्यान साधारण महिनाभराचा वेळ या स्पर्धेसाठी उरला असतानाच भारतासमोर कर्णधारपदाचा प्रश्न होता. पण आता हा प्रश्न सुटण्याची शक्यता वाढली आहे.