Suryakumar Yadav explosive batting against Hyderabad
ESAKAL
Suryakumar Yadav and Musheer Khan Star as Mumbai beat Hyderabad: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधारपद गेलं... भारतीय संघातील स्थानही गेलं... त्यानंतर मुंबईच्या रणजी करंडक स्पर्धेसाठीच्या संघातही स्थान नाही मिळाले.. अशा परिस्थितीतही सूर्यकुमार यादव आपल्या ध्येयापासून डगमगला नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करताना त्याने पहिल्याच सामन्यात वादळी अर्धशतक झळकावले. त्याने १५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. हैदराबादच्या गोलंदाजांचा त्याने अक्षरशः पालापाचोळा केला.