भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतीतून पूर्ण सावरला असून आशिया कप २०२५ साठी सज्ज आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्या कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका पाकिस्तानी खेळाडूने सूर्या आमच्याविरुद्ध प्रभावी ठरू शकत नाही, असा दावा केला होता.
Suryakumar Yadav comeback story before Asia Cup Pakistan clash : भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून आता तो आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी तयार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे, कारण पाकिस्तानी खेळाडूने सूर्याला डिवचले आहे. सूर्या आमच्याविरुद्ध प्रभावी कामगिरी करू शकत नाही, असा दावा पाकिस्तानी खेळाडूने केला होता. त्यामुळे आता सूर्या त्याला कामगिरीतून उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे.