युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावरून अजूनही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
चहलने पॉडकास्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या, तर धनश्रीनेही तिच्या बाजूच्या गोष्टी उघड केल्या.
सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी हिने इन्स्टाग्राम स्टोरीतून धनश्रीच्या धाडसाचे कौतुक केले.
What did SKY’s wife say about Dhanashree divorce rumours : युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी वैवाहिक नातं तोडलं असलं तरी त्यांच्या घटस्फोटावरून अजूनही चर्चा सुरूच आहेत. चहलने एका पॉडकास्टमध्ये या नात्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यानंतर धनश्रीनेही तिच्या बाजूच्या काही गोष्टी उघड केल्या. या प्रकरणात कुणी चहलच्या बाजूने उभं राहिलं तर कुणी धनश्रीला सपोर्ट केला. मात्र, भारताचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्नी देविशा शेट्टी हिच्याकडून धनश्रीला अनपेक्षितपणे पाठिंबा मिळाला आहे.