

Gujarat Titans IPL 2026 GT vs PBKS
Sakal
IPL 2026, GT vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना सुरू आहे.
या सामन्यात पहिला डाव गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी गाजवला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्सला त्यांनी दीडशे धावांसाठीही संघर्ष करायला लावला. तरी पंजाबसाठी सुर्यांश शेडगे आणि मार्कस स्टॉयनिस यांनी दिलेल्या लढाईमुळे गुजरातसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवता आले.