
मुंबई : सुवेद पारकर आणि विक्रांत औटी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बांद्रा ब्लास्टर्स संघाने रविवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी सामन्यात एमएससी मराठा रॉयल्सचा आठ विकेट राखून पराभव केला व टी-२० मुंबई लीग या स्पर्धेतील यंदाच्या मोसमात उपांत्य फेरी गाठली.