
Syed Mushtaq Ali T20 Trophy Final: सय्यद मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत आज (१५ डिसेंबर) मुंबईचा अंतिम सामना मध्य प्रदेशविरुद्ध होत आहे. फॉर्मात असलेल्या मुंबईला विजेतेपद मिळण्याची अधिक संधी आहे; मात्र सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित आहे.
मुंबईने उपांत्य फेरीअगोदरच्या दोन सामन्यांत सव्वादोनशेच्या पलीकडचे आव्हान पार करून आपली ताकद दाखवली. विशेष म्हणजे त्या दोन्ही सामन्यांत भारताचा ट्वेन्टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर अपयशी ठरले होते. उपांत्य सामन्यात मात्र अय्यरने अपेक्षा पूर्ण केल्या होत्या.