

Syed Mushtaq Ali Trophy live Keral vs Mumbai: केरळच्या संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या आज उभारली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करताना केरळने २० षटकांत ५ बाद २३४ धावा उभ्या केल्या. केरळकडून रोहन कुन्नूम्मल ( Rohan Kunnummal) आणि सलमान निझार ( Salman Nizar) यांनी आक्रमक खेळी केली. मुंबईचा शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी विराजमान झाला.