Urvil Patel Smashes 31-Ball Hundred
esakal
Impact of Urvil Patel’s record on Sanju Samson’s chances : इंडियन प्रीमिअर लीग २०२६च्या ट्रेड विंडोत चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात संजू सॅमसनचा समावेश करून घेतला. पण, संजूला आव्हान देणारी खेळी आज उर्विल पटेलने केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गुजरातच्या कर्णधाराने ३१ चेंडूंत शतक झळकावले. हे भारतीय क्रिकेटपटूने ट्वेंटी-२०त झळकावलेले तिसरे जलद शतक ठरले आहे आणि या विक्रमात पहिला क्रमांका उर्विलचाच आहे. त्याने मागील वर्षी २८ चेंडूत शतकी खेळी केली होती.