
Highest T20 Score: बडोदा संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम गुरुवारी नावावर केला. त्यांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या लढतीत सिक्कीमविरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला. भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३००+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी झिम्बाब्वे व नेपाळ यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० तीनशेहून अधिक धावा चोपल्या आहेत. बडोदा संघाने आज ५ बाद ३४९ धावांचा एव्हरेस्ट उभा केला आणि ही ट्वेंटी-२०तील सर्वोच्च धावसंख्या ठरली.