

T20 Mumbai League
esakal
मुंबई : गतविजेत्या मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई लीगचे विजेतेपद यशस्वीरित्या कायम राखले. त्यांनी शनिवारी येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात आर्क्स अंधेरीवर आठ धावांनी मात केली. चिन्मय सुतारचे झुंजार अर्धशतक आणि तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखालील शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर रॉयल्सने संयम राखत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.