T20 Mumbai League 2026 SoBo Falcons full squad
मुंबई : सोबो मुंबई फाल्कन्सने ट्वेंटी-२० मुंबई लीगच्या चौथ्या हंगामासाठी तगडा संघ तयार केला आहे. त्यांनी आपला आयकॉन खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यरला २२ लाख रुपयांत संघात कायम ठेवले. आपल्या तीनही राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड्सचा पूर्ण वापर करून सर्व विभागांत समतोल राखणारा एक भक्कम १७ सदस्यांचा संघ तयार केला आहे. यामध्ये आकाश पारकरचा समावेश होता, ज्याला १२ लाख रुपयांच्या बोलीवर संघात पुन्हा स्थान मिळाले.