Wankhede Stadium’s Pitch No. 7 is set to host the India vs England T20 World Cup 2026 semifinal.
esakal
India vs England semifinal 200 plus score prediction: भारत आणि इंग्लंडचा संघ २०२२ आणि २०२४ नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत समोरासमोर येत आहे. मागील दोन्ही सामन्यांत विजयी झालेल्या संघाने जेतेपदाची ट्रॉफी उचलली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील विजेता संघच जेतेपद पटकावेल, असा अंदाज बांधला जातोय. यजमान भारतीय संघाला या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नसली तरी उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या खेळाडूने मॅच विनिंग खेळी करून दाखवली आहे. इंग्लंडच्या प्रवासात त्यांचा सांघिक खेळ महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कट्टर लढत पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. पण, या सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.