T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

India vs England T20 World Cup Semi Final Marathi: इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत संजू सॅमसनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. त्याने षटकार ठोकत केवळ २६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची तुफानी खेळी साकारत भारताच्या डावाला भक्कम पाया घातला.
Sanju Samson INDvsENG Semi Final T20wC ( Photo Credit : Vijay Bate)

Sanju Samson INDvsENG Semi Final T20wC ( Photo Credit : Vijay Bate)

esakal

Updated on

T20 World Cup India vs England Semi Final Marathi Cricket News: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या उपांत्य फेरीत संजू सॅमसनने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी करत सलग दुसरे अर्धशतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला दमदार सुरुवात करून दिली. संजूचा तिसऱ्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने झेल टाकला आणि त्याचा पश्चाताप आता त्याला होत असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com