Shimron Hetmyer DRS controversy vs India explained
esakal
India vs West Indies Super 8s Marathi Cricket Updates : जसप्रीत बुमराहने एका षटकात दोन सेट फलंदाजांना बाद करून भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ११ षटकात १०० धावा फलकावर चढवल्या होत्या, परंतु जस्सीने टाकलेल्या १२ व्या षटकात शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer’s Wicket) व रोस्टन चेस हे दोन्ही सेट फलंदाज बाद झाले. मात्र, हेटमारयच्या विकेटवरून वाद सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विंडीजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यानेही तीव्र नाराजी व्यक्त केली.