South Africa spinners train hard in nets as Aiden Markram bowls
esakal
Albie Morkel batting in nets vsAiden Markram bowling : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8s चा सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने चालू वर्ल्ड कप स्पर्धेतील तीन सामने खेळले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे आधीच अडव्हांटेज आहे. अशात त्यांनी भारताच्या अ गटातील सर्व सामन्यांचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय आणि त्यांनी भारताची दुखती नस पकडली आहे. त्यामुळेच भारतावर कुरघोडी करण्यासाठी आफ्रिकेने त्यांचा हुकूमी एक्का काढला आहे. आज सराव सत्रातून हे चित्र स्पष्ट झाले आहे.