Pakistani journalist directly asked Salman Ali Agha whether he would quit captaincy or be removed by PCB
esakal
Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...
Viral video of Pakistani journalist questioning captaincy: पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८मध्येच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानला या स्पर्धेत अपेक्षांवर खरं उतरता आले नाही. स्टार फलंदाज बाबर आजम याला तर शेवटच्या साखळी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवले गेले, एवढी त्याची कामगिरी खराब झाली. गोलंदाजांनाही फार प्रभाव टाकता आला नाही आणि ज्या फिरकीपटू उस्मान तारीकची हवा झालेली, तोही अपयशी ठरला. त्यामुळे आता संघात आगामी काळात बदल झालेले पाहायला मिळू शकतात.. संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी कर्णधार सलमान अली आघावर ढकलून त्याला हटवले जाऊ शकते...या संदर्भातला थेट प्रश्न पाकिस्तानी पत्रकाराने केला, तेव्हा पत्रकार परिषदेत काहीकाळासाठी शांतता पसरली होती.
