World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

T20 World Cup 2024 Team India all Players : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. बरेच दिवस चाहते टीम इंडियाच्या संघाची वाट पाहत होते.
T20 World Cup 2024 Team India all Players News Marathi
T20 World Cup 2024 Team India all Players News Marathisakal

T20 World Cup 2024 Team India all Players : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. बरेच दिवस चाहते टीम इंडियाच्या संघाची वाट पाहत होते. मंगळवारी 30 एप्रिल रोजी मुख्य निवडकर्त्याने 15 सदस्यीय संघाची निवड केली. भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह किंवा सूर्यकुमार यादव यांची निवड होणार हे निश्चित होते, पण बाकीच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये स्थान मिळवले.

भारतीय संघातील 15 पैकी नऊ खेळाडू 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये निवड झालेल्या 15 खेळाडूंची आयपीएल मधील कामगिरी कशी आहे यावर आपण एक नजर टाकूया.

T20 World Cup 2024 Team India all Players News Marathi
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

रोहित शर्मा : आतापर्यंत या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही पण रोहित मात्र चांगली कामगिरी करत आहे. 1 शतकासह, त्याने 160.30 च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत एकूण 311 धावा केल्या आहेत.

हार्दिक पांड्या : मुंबईच्या कर्णधाराने नऊ आयपीएल सामन्यांमध्ये 197 धावा केल्या आहेत आणि सुमारे 12 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजीमध्ये फक्त चार विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या या हंगामात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

यशस्वी जैस्वाल : राजस्थान रॉयल्सच्या सलामीच्या फलंदाजाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध 59 चेंडूत शतक ठोकले.

विराट कोहली : भारतीय संघाच्या निवडीपूर्वी विराटच्या स्ट्राईक रेटबद्दल बरीच चर्चा झाली होती, पण त्याने दहा सामन्यांमध्ये 500 हून अधिक धावा करून टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. या हंगामात पहिले शतक फक्त कोहलीच्या बॅटमधूनच दिसले.

सूर्यकुमार यादव : भारताचा मिस्टर 360 डिग्री म्हटला जाणारा सूर्यकुमार यादव दोन ऑपरेशननंतर पूर्णपणे तंदुरुस्त झाला. आणि या हंगामात चांगल्या फॉममध्ये दिसत आहे. सूर्यकुमारने पंजाब किंग्जविरुद्ध 78 धावा केल्या.

T20 World Cup 2024 Team India all Players News Marathi
Hardik Pandya : कर्णधार पांड्यावर लागणार बंदी; BCCI ने हार्दिकसह संपूर्ण मुंबई संघांवर घेतली मोठी ॲक्शन

ऋषभ पंत : डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर परतलेल्या पंतने उत्कृष्ट फॉर्म दाखवला आणि दहा सामन्यांमध्ये 160.60 च्या स्ट्राइक रेटने 371 धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चांगल्या टच मध्ये दिसत आहे, त्याने या हंगामात आतापर्यंत 385 धावा केल्या आहेत ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.

शिवम दुबे : दुबेने आतापर्यंत या हंगामात गोलंदाजी केली नसली तरी नऊ सामन्यांत 172.41 च्या स्ट्राईक रेटने 350 धावा केल्या आहेत

रवींद्र जडेजा : चेन्नईच्या या अष्टपैलू खेळाडूने नऊ सामन्यांमध्ये 157 धावा केल्या आहेत आणि पाच विकेट घेतल्या आहेत.

अक्षर पटेल : त्याने या हंगामात 150 च्या जवळपास धावा करण्याबरोबरच त्याने नऊ विकेट्सही घेतल्या आहेत.

T20 World Cup 2024 Team India all Players News Marathi
Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

कुलदीप यादव : नऊ सामन्यांत 12 विकेट घेणारा कुलदीप गेल्या एक वर्षापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

युझवेंद्र चहल : या लेगस्पिनरने नऊ सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएलच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

अर्शदीप सिंग : या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने नऊ सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने चार विकेट घेतल्या होत्या.

जसप्रीत बुमराह : त्याने या हंगामात नऊ सामन्यांमध्ये 6.63 च्या इकॉनॉमी रेटने 14 बळी घेतले आहेत.

मोहम्मद सिराज : या हंगामात तो खराब फॉर्मशी झुंजत आहे आणि आरसीबीने त्याला एका सामन्यातही बाहेर ठेवले होते. आत्तापर्यंत नऊ सामन्यांत केवळ सहा विकेट घेतल्या आहेत आणि तो खूप महागडा ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com