Pakistan could boycott the India match in the T20 World Cup 2026
esakal
India vs Pakistan T20 World Cup match controversy : बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) बऱ्याच मिर्च्या झोंबलेल्या दिसत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या समर्थनात मैदानावर उतरत पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) धमकी देत सुटले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी आज सायंकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ ( Shehbaz Sharif) यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत जो निर्णय होईल, तो पाकिस्तान क्रिकेट संघाला मान्य करावा लागेल, हे नक्वी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यात आता पाकिस्तान संपूर्ण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेऐवजी फक्त भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.