PCB writes letter to ICC supporting Bangladesh refusal
esakal
ICC decision on Bangladesh participation T20 World Cup: बांगलादेश क्रिकेट बोर्ड अन् बांगलादेश सरकार यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाबत घेतलेली भूमिका, सोडलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) यांनी डेडलाईन देऊनही बीसीबी माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांचा अजूनही भारतात खेळण्यास नकारच आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही ( PCB ) बांगलादेशच्या भूमिकेला पाठिंबा देणारे पत्र आयसीसीला लिहिले आहे. पीसीबीने प्रशासकीय मंडळाला पत्र लिहून सांगितले की, राजकीय अस्थिरतेच्या काळात भारतात खेळू नये या बीसीबीच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो.